ग्रामस्थांच्या एकीने वन्य प्राण्यांची भागवली तहान

 

दौंड प्रतिनिधी,
प्रा.सुनिल नगरे

सध्या उन्हाचा जोर चांगलाच वाढला आहे. उन्हाळ्यात पाण्याची जलपातळी खाली गेल्याने पाण्याची चणचण भासत आहे. अशा उन्हाळ्यात तहान लागली की माणूस पाण्याकडे धाव घेतो. मुक्या प्राण्यांचे देखील तसेच आहे. ते कोणाला मागू शकत नाहीत. ते आपली तहान पाण्याचा शोध घेऊन भागवतात, पण सध्या वन्यप्राण्यांना पिण्यासाठी असणारे छोटे छोटे जलसाठे कोरडे पडले आहेत.
दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा परिसरात अभयारण्य वनक्षेत्र बऱ्याच प्रमाणात असल्याने तेथे हरीण,चिंकारा ,तरस, लांडगा, ससे,तसेच मोर पक्षी यांसारखे अनेक छोटेमोठे प्राणी आढळून येतात.या भागात पाण्याची भीषण टंचाई भासत असल्याने अशा प्राण्यांना पाण्याअभावी मोठी कसरत करावी लागत आहे.वन्यप्राण्यांची होणारी धावपळ व पाणीटंचाईची भीषण गंभीरता लक्षात घेऊन देऊळगाव गाडा ग्रामपंचायतिने पुढाकार घेऊन सर्व ग्रामस्थांच्या वतीने वनरक्षक पद्मिनी कांबळे,वन कर्मचारी नौशाद शेख यांच्या सहकार्याने दि.28 मे रोजी एक टँकर पाणी पाणवठ्यात सोडण्यात आले.
याप्रसंगी सरपंच विशाल बारवकर,अक्षय बारवकर, मल्हारी बारवकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

2,904 thoughts on “ग्रामस्थांच्या एकीने वन्य प्राण्यांची भागवली तहान