ग्रामदैवत अंकलेश्वर देवाच्या यात्रेला रविवार  पासून सुरुवात

अकोले प्रतिनिधी:

येथील ग्रामदैवत अंकलेश्वर देवाच्या यात्रेला रविवार पासून सुरुवात होत आहे.चैत्र वद्य प्रतिपदा रविवार (दि.१७) पासून  दोन दिवस होणाऱ्या यात्रेसाठी गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक आणि महापूजा झाल्यानंतर  यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमामध्ये यात्रेनिमित्त दुपारी ४ वाजता निशाण काठयांची सुवाद्य मिरवणूक होणार आहे. रात्री ८ वाजता ढोल-ताशांच्या गजरात गावातून देवाचा छबिना मिरवणूक निघणार असून यात्रे निमित्त फटाक्यांची आतिषबाजीने यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या कार्यक्रमा नंतर ग्रामस्थांच्या वतीने शेरणी वाटप व यात्रेनिमित्त आलेल्या लोकांसाठी रात्री दहा वाजता अंजलीराजे नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.यात्रा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर दुपारी २ ते ४ वाजता कलगीवाले व तुरेवाले यांचा भेदीक सामना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांनतर दुपारी ४ वाजता नामांकित मल्लांच्या कुस्त्याचा आखाडा  भरवण्यात येणार आहे. खास अकोले येथील यात्रेसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्यने येत असतात.यावेळी यात्रेच्या निमित्ताने अंकलेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Google Ad

4 thoughts on “ग्रामदैवत अंकलेश्वर देवाच्या यात्रेला रविवार  पासून सुरुवात

  1. I do not even understand how I stopped up here, but I believed this put up was once great. I don’t know who you might be however certainly you’re going to a well-known blogger if you aren’t already. Cheers!|

  2. Every weekend i used to pay a quick visit this web site, for the reason that i wish for enjoyment, as this this web site conations really pleasant funny data too.|

Leave a Reply

Your email address will not be published.