भिगवण येथील ग्रामदैवत श्री.भैरवनाथ महाराज यात्रेस रविवारपासून प्रारंभ

भिगवन प्रतिनिधी

येथील ग्रामदैवत श्री.भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेस रविवार दि. 24 पासून प्रारंभ होणार असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती सरपंच तानाजी वायसे व अशोक काटे यांनी दिली. रविवारी सकाळी 7 वा. भैरवनाथ मंदिरामध्ये अभिषेक केला जाणार आहे, तदनंतर नैवेद्य व शेरणी वाटपाचा कार्यक्रम होणार असून रात्री नऊ ते दहा वा.च्या सुमारास सवाद्य पालखी मिरवणूक,छबिना निघणार आहे त्यानंतर रात्री 11वा. फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे आणि 12 वा.अहो नादच खुळा ऑर्केस्ट्रा होणार आहे,दि.25 रोजी सकाळी,बारा गावच्या बारा अप्सरा हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच सायंकाळी आखाडा पूजन करून निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरणार आहे तर मंगळवार दि.26 रोजी गर्जा महाराष्ट्र हा महिलांसाठी कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.दोन वर्षे कोरोना महामारी मुळे यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले होते यंदा मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्याने ही यात्रा मोठया भक्तिभावाने साजरी होणार आहे.भिगवण हे गाव पंचक्रोशीतील केंद्रबिंदू असल्याने या परिसरातील नागरिकही उत्साहाने या यात्रेत सहभागी होत असतात, भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता येथील यात्रा समितीने पार्किंग सह योग्य ते सर्व नियोजन केलेले असून,यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

Google Ad

15 thoughts on “भिगवण येथील ग्रामदैवत श्री.भैरवनाथ महाराज यात्रेस रविवारपासून प्रारंभ

  1. Great post. I was checking constantly this blog and I am impressed! Very useful information specifically the closing part 🙂 I handle such information much. I was seeking this certain information for a long time. Thanks and best of luck. |

Leave a Reply

Your email address will not be published.