दौंड तालुक्यातील विद्यार्थी ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी

दौंड प्रतिनिधी:सुनील नगरे

राज्यस्तरीय मायमराठी व्याकरण ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा २०२१-२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील तब्ब्ल 27 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
दरवर्षी मायमराठी व्याकरण ऑलिम्पियाड परीक्षा संस्थेद्वारे मराठी व्याकरणावर आधारित पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर मराठी ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन केले जाते.यात् पहिली ते दहावीच्या प्रत्येक वर्गात राज्यभरातून प्रथम तीन क्रमांक काढले जातात.यात् यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह,पदक,प्रमाणपत्र,व रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
या परीक्षेस् राज्याभरतून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.कोरोना महामारीमुळे ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली. या परीक्षेत दौंड तालुक्यातील राज्य राखीव पोलीस पब्लिक स्कूल,दौंड 13,ओम इंग्लिश मेडीयम स्कूल,दौंड 1,जनता प्राथमिक विद्यामंदिर,दौंड 1, जि.प.प्राथमिक शाळा गोपाळवाडी 1,जि.प.प्रा.शाळा मळद् 1,कटारिया इंग्लिश मेडीयम स्कूल काळेवाडी 4,शांताबाई ठोंबरे प्रायमरी स्कूल दौंड 1,न्यू इंग्लिश स्कूल खामगाव 1,भागवत माध्यमिक विद्यालय माळवाडी 1,संत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय दौंड 1,पोतदार इंग्लिश मेडीयम स्कूल दौंड 1 व राजेभोसले विद्यालय खानवटे येथील 2 अशा एकूण 27 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले.
मराठी भाषेचा आत्मा म्हणजे मराठी व्याकरण. विद्यार्थ्यांना लहान वयातच मराठीची गोडी लागावी व त्यांचा मराठी व्याकरणाचा पाया भक्कम व्हावा या दृष्टीने या परीक्षेचे राज्यभरातून आयोजन केले जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.संतोष भांडवलकर यांनी दिली.तसेच सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.