समृद्धी जरांडेचे कुस्ती स्पर्धेत यश

रावणगाव प्रतिनिधी:

रावणगाव ( ता.दौंड ) येथील पैलवान कुमारी समृध्दी आबा जरांडे हिने रविवार ( ता. 26 ) रोजी श्रीरामपूर येथे पार पडलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज कुस्ती स्पर्धेत 42 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत शाहू केसरी किताब मिळविला.
समृद्धी सध्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील ताराराणी कुस्ती केंद्रात कुस्ती प्रशिक्षक सुहास तरंगे आणि सत्पाल सिंह यांच्या मार्दर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे.समृद्धीचे वडील आबा जरांडे हे देखील पैलवान असल्याने त्यांनी देखील समृद्धीला कुस्तीचे धडे दिले आहेत.
समृद्धीने ही स्पर्धा जिंकल्याने तिला सुवर्णपदक , चांदीची गदा , सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.समृद्धीने मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Google Ad

3 thoughts on “समृद्धी जरांडेचे कुस्ती स्पर्धेत यश

Leave a Reply

Your email address will not be published.