सचिन बोगावत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा खजिनदार पदी नियुक्ती

सचिन बोगावत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा खजिनदार पदी नियुक्ती

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण येथील प्रसिद्ध व्यावसायिक व भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन बोगावत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा खजिनदार पदी निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर व महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरून लाड यांच्या उपस्थितीत त्यांना पत्र देऊन निवड करण्यात आली.

यापूर्वी सचिन बोगावत हे भिगवण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाचा कार्यभार पाहत होते.त्यांनी पक्षासाठी, पक्ष वाढीसाठी प्रमाणिकपणे व निष्ठेने काम केले आहे.

याच बरोबर रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.कोरोना साथीच्या काळातही त्यांनी चांगले काम केलेले असून, रूग्नाना सवलतीत योग्य उपचार मिळवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या झालेल्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

यावेळी आपण आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांचा आदर्श समोर ठेऊन, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे , राज्यमंत्री दत्तामामा भरणे , प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली , सर्वांना विश्वासात घेऊन निष्ठेने काम करणार असल्याचे सचिन बोगावत यांनी सांगितले.

Google Ad

6 thoughts on “सचिन बोगावत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा खजिनदार पदी नियुक्ती

  1. 850946 792963I dont believe Ive read anything like this before. So good to locate somebody with some original thoughts on this subject. thank for starting this up. This site is something that is necessary on the internet, someone with just a little originality. Excellent job for bringing something new towards the internet! 103120

  2. 982179 769984I was reading by way of some of your content material on this internet internet site and I believe this web site is really instructive! Keep putting up. 374170

Leave a Reply

Your email address will not be published.