रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भिगवण कोविड केअर सेंटरला रोटरी क्लब कडून २५ बेड ची मदत

 

भिगवण प्रतिनिधी, दि.१४/९/२०२०
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन भिगवण आणि परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले भिगवण कोविड सेंटर या ठिकाणी भिगवण परिसरातुन ४४ अॅक्टीव्ह रूग्णांना आरोग्य दुत सेवा देत आहे.

कोविड सेंटरमध्ये बेड ची आवश्यकता होती. ही आवश्यकता लक्षात घेऊन रोटरी क्लब भिगवण ,रोटरी क्लब डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब पिंपरी, रोटरी क्लब उद्योगनगरी, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज भिगवण कोविड सेंटरला 25 नवीन बेड देण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, प्रदीप वाकसे, प्रवीण वाघ ,डॉ.अमोल खानावरे, सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे, रणजित भोंगळे,संजय खाडे औदुंबर हुलगे, उपस्थित होते .ही मदत डाॅ.जीवन सरतापे, डाॅ. घोगरे, डाॅ. मृदुला जगताप यांच्याकडे सुपूर्द केली.

रोटरीयन मंजु फडके व नितीन ढमाले यांनी याकामी विशेष सहकार्य केल्याचे सचिन बोगावत यांनी सांगितले. तर कोविड सेंटरला आवश्यक मदत रोटरी क्लबचे माध्यमातून या अगोदर केली आहे. येणाऱ्या पुढील काळात देखील मदत करू असे अध्यक्ष संपत बंडगर यांनी सांगितले.

रोटरी क्लब यांच्यावतीने कोरोना काळात वेळोवेळी करण्यात येणारी मदत यामुळे त्यांचे नागरिकांमधून अभिनंदन होत आहे.

Google Ad

6 thoughts on “रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भिगवण कोविड केअर सेंटरला रोटरी क्लब कडून २५ बेड ची मदत

  1. 667575 401349Have read a couple of of the articles on your internet site now, and I actually like your style of blogging. I added it to my favorites blog site list and will probably be checking back soon. 862821

Leave a Reply

Your email address will not be published.