उजनी जलाशयातील भीमा नदीपात्रात सापडला दुर्मिळ चित्तल जातीचा मासा

 

दौंड प्रतिनिधी :
प्रा.सुनिल नगरे

सोलापूर जिल्ह्यातील भिमानगर ता.माढा येथे भीमा नदीवर असणाऱ्या उजनी धरणाचा पसारा दौंड तालुक्यातील राजेगाव-मलठण गावापर्यंत पसरला आहे.त्यामुळे या उजनी जलाशयात वेगवेगळ्या प्रकारचे मासे पहावयास मिळतात.

असाच एक दुर्मिळ चित्तल जातीचा मासा भीमा नदीपात्रात सापडला आहे.खानवटे येथील भीमानदीपात्रात पांडुरंग सलमपुरे हे पारंपरिक पद्धतीने वडपच्या साहाय्याने मासेमारी करतात.दि.6 एप्रिल रोजी मासेमारी करत असताना त्यांना चित्तल (चालट)जातीचा साडेआठ किलोचा मासा सापडला.अशा प्रकारचे मासे उजनी जलाशयात सहसा पहावयास मिळत नाहीत. उजनी जलाशयात नियमितपणे सापडणाऱ्या चालट जातीच्या माशाचे वजन सरासरी 200 ते 300 ग्रॅमपर्यंत असते.पण साडेआठ किलोचा चित्तल (चालट)जातीचा मासा प्रथमच उजनी जलाशयात सापडला आहे.त्यामुळे सर्वत्र या चित्तल माशाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

Google Ad

450 thoughts on “उजनी जलाशयातील भीमा नदीपात्रात सापडला दुर्मिळ चित्तल जातीचा मासा

  1. Pingback: madridbet
  2. Pingback: fuck google
  3. Pingback: fuck google
  4. Pingback: grandpashabet