अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले राजवर्धन पाटील

 

 1. भिगवण : प्रतिनिधी (दि.१४/८/२०२०)
  आप्पासाहेब गायकवाड

  पुणे सोलापूर महामार्गावरील काळेवाडी नजीक एका होंडा-सिटी कार ने मोटारसायकल ने प्रवास करत असलेल्या दोन व्यक्तींना धडक देऊन पुढे गेली. यावेळी घटनास्थळी लोकांनी बघ्याची भुमिका घेत गर्दी केली होती याच वेळी तेथुन जात असताना राजवर्धन पाटील तेथे पोहोचले माणुसकीचे नाते दाखवत तात्काळ दोन्ही अपघात ग्रस्तांना त्यांच्या स्वतःच्या गाडीत घेऊन भिगवण येथील थोरोत अॅक्सिडंट हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.
  डाॅ. अजय थोरात यांनी दोन्ही अपघात ग्रस्तावर उपचार सुरू केले. अपघातातील व्यक्तीच्या पायाला व डोक्याला गंभीर मार लागला आहे.
  राजवर्धन पाटील यांच्या तत्परतेमुळे वेळेत उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला .यावेळी हॉस्पिटल मध्ये
  भिगवण चे मा. सरपंच पराग जाधव व पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे उपस्थित होते. त्यांनी झालेल्या अपघाताची कल्पना अपघात ग्रस्तांच्या कुटुंबीयांना फोनवरून दिली.

Google Ad

4 thoughts on “अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले राजवर्धन पाटील

 1. 973746 56231Hello! I just wish to give an enormous thumbs up for the excellent info you may have right here on this post. I can be coming again to your blog for a lot more soon. 521462

Leave a Reply

Your email address will not be published.