रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष व समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

दौंड प्रतिनिधी,सुनिल नगरे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासक नेतृत्व व गेली दोन वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेना पक्षाने राज्यातील गोरगरीब शेतकरी यांच्यासाठी राबविलेल्या विविध योजना ,पीकविमा कंपण्यांविरुद्ध संघर्ष करून शेतकऱ्यांना मिळवून दिलेली मदत,कोरोना महामारीमध्ये सामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे राबविण्यात आलेले उपक्रम व गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस,शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या उद्धव ठाकरे यांची कार्यशैली व संयमी व्यक्तिमत्त्व यावर प्रभावित होऊन रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ माऊली आहेर व त्यांचे समर्थक शंकरराव शितोळे,प्रशांत जगताप,बाळासाहेब कोंडे,गणेश गायकवाड यांनी केडगाव येथील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी माऊली आहेर म्हणाले की,गेल्या 20 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत असताना आलेल्या अनुभवातुन व सद्यस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांबाबत असलेली तळमळ पाहून शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून माझ्या कार्यशैलीला नक्कीच बळ मिळणार आहे.यापुढे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून युवक कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाने संपूर्ण ताकदीने पक्षासाठी काम करणार आहे. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या नेतृत्वाखाली दौंड तालुक्यात पक्षाची वाटचाल वेगाने होत असून ,पक्ष प्रवेशासाठी हीच योग्य वेळ असल्याचे यावेळी आहेर यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी माऊली आहेर व पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत केले.याप्रसंगी शिवसेना दौंड तालुका प्रमुख देविदास दिवेकर,विभाग प्रमुख हनुमंत निगडे व इतर शिवसैनीक,पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Google Ad

40 thoughts on “रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष व समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  1. 382518 609500Youre so cool! I dont suppose Ive read anything like this before. So nice to find somebody with some original thoughts on this subject. realy thank you for starting this up. this site is something that is necessary on the internet, someone with slightly originality. helpful job for bringing something new towards the internet! 300248

  2. 73869 713890There a couple of fascinating points in time in this post but I dont know if I see these center to heart. There may possibly be some validity but Ill take hold opinion until I explore it further. Exceptional post , thanks and then we want a lot more! Put into FeedBurner too 686852

  3. 309450 900932Hello, you used to write fantastic, but the last few posts have been kinda boringK I miss your great writings. Past several posts are just a little bit out of track! come on! 989749

Leave a Reply

Your email address will not be published.