दौंड शहरातील दुकानावर पोलिसांचा छापा:32 हजारांचा गुटखा जप्त

 

दौंड प्रतिनिधी,
प्रा.सुनिल नगरे

दौंड शहरातील खाटीक गल्ली येथील एका किराणा दुकानावर दौंड पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दुकानदाराने साठा करून ठेवलेला सुमारे 32 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
तायफ अनिस शेख, वय 26 वर्षे, रा.बेताल कॉलनी, खाटीक गल्ली,दौंड शहर असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे.ही घटना रविवार दि.9 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायफ शेख याने गुटख्याबाबत महाराष्ट्र राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त व अन्न व औषधे प्रशासन यांची अधिसूचना 15 जुलै 2020 नुसार गुटखा,पानमसाला, स्वादिष्ट सुगंधित तंबाखू,स्वादिष्ट सुगंधित सुपारी,अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू यांची निर्मिती, साठवण,वाहतूक किंवा विक्री यास 20 जुलै 2020 पासून प्रतिबंध घालण्यात आला आहे.असे असूनदेखील संबधित दुकानदाराने विनापरवाना बेकायदेशीर गुटखा साठवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिस पथकाने दि.9 मे रोजी दुकानावर छापा टाकून सुमारे 32 हजारांचा गुटखा जप्त केला आहे.याप्रकरणी तायफ शेख याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान अंतर्गत 188, 269, 272, 273 सह अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार गावडे करीत आहेत.

Google Ad

36 thoughts on “दौंड शहरातील दुकानावर पोलिसांचा छापा:32 हजारांचा गुटखा जप्त

  1. 731105 80581Wow, amazing blog layout! How long have you been blogging for? you make blogging appear simple. The overall appear of your website is fantastic, as properly as the content material! 421305

Leave a Reply

Your email address will not be published.