भिगवण शिक्षण प्रसारक मंडळास डिप्लोमा व एम. ए. अभ्यासक्रमास मान्यता- अजित क्षीरसागर

 

भिगवण प्रतिनिधी दि.१६/९/२०२०
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण (ता. इंदापूर) येथील, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम (Diploma in school Management) आणि  एम. ए.(शिक्षणशास्त्र) या विद्याशाखा सुरू करण्यास नुकतीच परवानगी/मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी दिली.

या संस्थेमध्ये सन २०१५ पासून बी. ए. अभ्यासक्रमाचे मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू आहे. सध्याचा कोरोणा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांना चालू वर्षी तरी महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य होईल की नाही? हे सांगता येणार नाही. त्यामुळे संस्थेने विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रणालीद्वारे शिक्षण घेता यावे याकरिता वरील अभ्यासक्रमाचे प्रस्ताव मुक्त विद्यापीठामध्ये सादर केले होते. हे अभ्यासक्रम मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, डी. एड, बी. एड धारक विद्यार्थी यांचेसाठी विशेष आवश्यक असून सदरचे अभ्यासक्रम हे शैक्षणिक वर्ष २०२०/२१ पासून सुरू होत आहेत असे या विभागाच्या प्राचार्या डॉ. उज्वला लोणकर यांनी सांगितले.

तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची कॉलेज मध्ये जाऊन शिक्षण घेण्याची मानसिकता नाही, कोरोनाची भीती/तीव्रता अजूनही आहे .त्यामुळे जे शिक्षणापासून वंचित आहेत, आर्थिक दृष्टया दुर्बल आहेत, शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेलेले आहेत असे सर्व विद्यार्थी, पालक, महिला व पात्रता धारक मुक्त विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या या विविध अभ्यासक्रमाच्या. माध्यमातून आपले शिक्षण दूरस्थ शिक्षण प्रणाली द्वारे पूर्ण करू शकतात असे मत संस्थेचे प्रशासन प्रमुख, प्राचार्य तुषार क्षीरसागर यांनी व्यक्त केले. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याने शिक्षण प्रेमी नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने सुरू झाले असून प्रवेश घेण्याचे आवाहन संस्था प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Google Ad

4 thoughts on “भिगवण शिक्षण प्रसारक मंडळास डिप्लोमा व एम. ए. अभ्यासक्रमास मान्यता- अजित क्षीरसागर

  1. 805613 707527Hello, Neat post. There is a issue with your web site in internet explorer, could test thisK IE nonetheless could be the marketplace leader and a large portion of people will leave out your outstanding writing due to this dilemma. 431088

Leave a Reply

Your email address will not be published.