भिगवण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

भिगवण प्रतिनिधी:

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ४० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यातून निश्चितच गरजूंना रक्त मिळण्यास मदत होणार आहे.
रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व संविधानाची प्रत देण्यात आली.
यावेळी,आण्णा धवडे,तुषार क्षीरसागर,अजिंक्य माडगे,,सचिन बोगावत,जावेद शेख, भरत मल्लाव,बाळासाहेब शेलार,रोहित शेलार,शरद चितारे,अमोल कांबळे,भारत माने, मंगेश शेलार,अप्पा पवार,सिद्धार्थ धेंडे, ललित शिंदे, विशाल शेलार,शुभम शेलार, भोला शेलार,सचिन आढाव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.