न्यूजपोर्टल,न्युज युट्यूब चॅनेल यांनी विश्‍वासार्हता निर्माण करावी: एस.एम.देशमुख

 

भिगवण प्रतिनिधी :

न्यूजपोर्टल,न्युज युट्यूब चॅनेलवाल्यांनी वाचकांच्या मनामध्ये विश्‍वासार्हता निर्माण करणे काळाची गरज असल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.
वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापुर तालुका सोशल मिडिया परिषदेच्या कार्यकारणीच्या निवडप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी वालचंदनगर कंपनीचे जनरल मॅनेजर धीरज केसकर, एकनाथ पेठे, मच्छिंद्र शिरसाट, शैलेश फडतरे, महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया परिषदेचे राज्य निमंत्रक बापूसाहेब गोरे, पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, हवेलीचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सुरज साळवे,बारामती तालुका संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी सांगितले की, सध्याच्या काळामध्ये डिजीटल मिडियाचे महत्त्व वाढत आहे. राज्यामध्ये १२ हजारापेक्षा जास्त न्युज पोर्टल व युट्यूब चॅनेल आहेत. ब्रेकींग न्यूज देण्यासाठी चढाओढ सुरु असते. सर्वांनी प्रिंन्ट मिडीया सारखी विश्‍वासार्हता निर्माण करावी. पेपरला छापून येणाऱ्या बातम्यावरती जसा वाचकांचा विश्‍वास असतो. तसाच विश्‍वास पोर्टलवाल्यांनी निर्माण करावा. येणाऱ्या काळामध्ये प्रिंट मिडीया सारखे न्यूज पोर्टलचे वर्गीकरण करुन डिजीटल मिडीयाला जाहिराती देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच राज्यातील पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी संघटना कायम बांधील असून लढा देण्याचे काम सुरु ठेवणार असल्याचे सांगितले.कार्य्रकमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर व डॉ.विकास शहा यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार थोरात,जिल्हा सरचिटणीस सतिश सांगळे यांनी केले.आभार तालुका संघाचे समन्वयक धनंजय थोरात यांनी मानले.

इंदापूर तालुका सोशल मिडिया परिषदेची कार्यकारणी पुढीलप्रमाणे…
राहुल ढवळे (अध्यक्ष) , गजानन टिंगरे (सचिव), तुषार क्षीरसागर (उपाध्यक्ष) , शहाजीराजे भोसले ( खजिनदार) , सचिन राजेभोसले,अमोल राजपुत, सिद्धार्थ मखरे,सागर घरत, सागर जगदाळे (कार्यकारी सदस्य)

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.