वृद्धापकाळात योग्य काळजी घेण्याची गरज: डाॅ.मृदुला जगताप

 

भिगवण प्रतिनिधी :

आरोग्य विभाग उपकेंद्र तक्रारवाडी अंतर्गत मदनवाडी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला यावेळी उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, मुखरोग इत्यादी तपासणी करण्यात आली यामध्ये ८६ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.

वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जागतिक स्तरावर वृद्ध व्यक्तींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे शारीरिक वृद्धत्व प्रक्रियेमुळे शारीरिक सामर्थ्य तसेच प्रतिकारशक्तीमध्ये घट होते शारीरिक क्षमतेमध्ये झालेली घट आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे वृद्धांनी आरोग्याची विशेष काळजी व चांगला आहार घेणे गरजचे आहे.वृद्धापकाळात उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात ,श्वसनाचे आजार उदासीनता यांसारखे विविध आजार जडतात यासाठी काय करावे काय करू नये या विषयी मार्गदर्शन केले. दररोज पोस्टीक आहार घ्यावा,दररोज योगा करावा,नियमित वैद्यकीय तपासणी करावी, डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्यावी, वेदने कडे दुर्लक्ष करू नये तज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये तंबाखू धूम्रपान मध्यपान सेवन इत्यादी करू नये नैराश्य वाटल्यास १०४ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी बोलताना सांगितले. यावेळी आरोग्य सहाय्यक ओंबासे आरोग्य सेविका भोस, मनीषा देवकाते, सविता देवकाते आदि उपस्थित होते.

Google Ad

45 thoughts on “वृद्धापकाळात योग्य काळजी घेण्याची गरज: डाॅ.मृदुला जगताप

Leave a Reply

Your email address will not be published.