तक्रारवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस चा झेंडा

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

तक्रारवाडी गावात कित्येक वर्षांपासून एकहाती असणारी सत्ता उलथवून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात यावेळी यश आले आहे. निवडणूक काळात सुरुवातीपासूनच तक्रारवाडी गावाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात ९ पैकी ७ जागांवर सर्वपक्षीय पॅनल ने विजय मिळवला परंतु सरपंच पद व गटबाजीमुळे पॅनल मध्ये फुट पडली व निवडणुकीपूर्वी पक्षविरहित असणाऱ्या गटाचे पक्षात रूपांतर झाले आणि यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला शह देत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा गट ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन्यासाठी यशस्वी झाला आहे.

निवडणुक अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस कडुन सतीश विनायक वाघ यांचा सरपंच पदासाठी,तर भारतीय जनता पार्टी कडुन शरद संपतराव वाघ यांचा अर्ज दाखल झाला तर उपसरपंच पदाच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडुन आशा साहेबराव जगताप तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्राजक्ता सचिन वाघ यांचा अर्ज दाखल झाला होता. नंतर सरपंच उपसरपंच साठी मतदान घेण्यात आले यामध्ये सतिश विनायक वाघ हे ७ मते मिळवून सरपंच पदी विजय झाले. तर शरद संपतराव वाघ हे २ मते मिळवत पराभूत झाले तर उपसरपंच पदी ५ मते मिळवुन आशाबाई साहेबराव जगताप यांनी विजय मिळवला तर,प्राजक्ता सचिन वाघ २ मते घेत पराभूत झाल्या. सरपंच पदी सतीश विनायक वाघ तर उपसरपंच पदी आशा साहेबराव जगताप यांना निवडणुक निर्णय अधिकारी यांनी विजयी जाहीर केले.

सरपंच सतीश वाघ यांनी सांगितले की, आपण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मा. बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, तसेच जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तक्रारवाडी च्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असुन सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन विकास करण्यासाठी काम करणार आहे.

यावेळी नितीन काळंगे, अविनाश धुमाळ, रामभाऊ जाधव, मोहनराव वाघ, विकास वाघ, किसन काळंगे, बापूराव मोरे, नितीन पिसाळ, दीपक वाघ आदींनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad

5 thoughts on “तक्रारवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस चा झेंडा

  1. 7351 596011Aw, this was a truly nice post. In thought I would like to spot in writing in this way moreover – taking time and actual effort to create a very very good article but what / issues I say I procrastinate alot and also no indicates apparently get something done. 975003

Leave a Reply

Your email address will not be published.