शिवभोजन थाळी केंद्राला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट

 

भिगवण प्रतिनिधी:

येथील शिवभोजन थाळी केंद्रास बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली. शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात भोजन मिळत असल्याबद्दल मान्यवरांनी
समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात,तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष हनुमंत कोकाटे, हनुमंत बंडगर, धनाजी थोरात, सचिन बोगावत, सतीश शिंगाडे, आण्णासाहेब धवडे,आबासाहेब बंडगर, ज्ञानेश्वर चोपडे, मोहन शेंडगे आदि उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे ही समाधानाची बाब आहे.

कार्यक्रमाचे संयोजन शिवभोजन थाळी केंद्र संचालक सुरेश बिबे व भारती बिबे यांनी केले या शिवभोजन केंद्राच्या वतीने महिन्याला दोनहजार  नागरिक शिवभोजनाचा लाभ घेत असतात असे बिबे यांनी सांगितले.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.