महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भिगवण शाखेचे उद्घाटन: अध्यक्षपदी कपिल लांडगे यांची निवड

 

भिगवण प्रतिनिधी :

भिगवण मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उदघाटन दि. ३ रोजी करण्यात आले.सुधीर पाटसकर यांचे हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यांनी सर्व पदाधिकारी यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत स्वागत केले . पाटसकर म्हणाले की, अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि भिगवण व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी येथील पदाधिकारी व आम्ही कटीबद्ध आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन येथील युवकांनी शाखा स्थापन केली असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम आम्ही या संघटनेमार्फत करणार असल्याचे अध्यक्ष कपिल लांडगे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी पुणे जिल्हा सचिव रामभाऊ काळे ,उपाध्यक्ष राजेंद्र हगारे,इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष भिसे ,जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, बारामती चे अध्यक्ष निलेश वाबळे ,प्रदीप रकटे,हनुमंत जाधव,मल्हारी लोखंडे,रोहित भोसले यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिगवण शाखेची नवनिर्वाचित कार्यकारीणी –

कपिल लांडगे – अध्यक्ष,
उपाध्यक्ष- शुभम थोरात व शुभम शेलार ,इंदापूर तालुका विद्यार्थी सेना उपाध्यक्ष- अक्षय बनसोडे,भिगवण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष- अमोल वाघमारे, सचिव- राहुल बनसोडे , खजिनदार- प्रेम जगताप ,संघटक – संजय शेगर ,कार्यध्यक्ष- सागर शिंदे ,सहसचिव-आलू मदारी तसेच कार्यकर्ते संतोष वाघमारे ,परशुराम मोतीकर ,
अक्षय मोतीकर ,यश भोईटे, सोमनाथ मोतीकर,रोहित मोरे,हर्षद लांडगे ,अभिषेक लांडगे ,गणेश सस्ते , बाबा खडके हेही उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भिसे यांनी केले तर आभार नवनाथ सुतार यांनी व्यक्त केले .

Google Ad

41 thoughts on “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भिगवण शाखेचे उद्घाटन: अध्यक्षपदी कपिल लांडगे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published.