कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात; कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह?

कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम
संशयाच्या भोवऱ्यात; कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह?

भिगवण प्रतिनिधी:

कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लक्ष देत नसल्याचे निदर्शनास येत आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

कुंभारगाव पोंधवडी पिंपळे या ग्रामीण मार्गासाठी अंदाजे ९ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.तर याचे काम व्ही .एच खत्री यांना मिळाले आहे.यातील पहिला टप्पा पुणे सोलापूर महामार्ग ते पोंधवडी असे सुरु करण्यात आलेले आहे.परंतु हे काम इस्टीमेंट प्रमाणे होत नसल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे ?याठिकाणी कंत्राटदार जुन्या रस्त्याच्या दोन बाजूनी एक ते दीड फुटाची चारी खणून त्यात खडी भरत असल्याचे दिसून येत आहे. तर खणलेली चारी मुरुमापर्यंत सुधा नेली जात नाही.त्यामुळे रस्ता तयार होताच आठ दिवसात दोन्ही बाजूने रस्ता खचणार हे निश्चित. आणि रस्त्याचे काम मजबूत होण्यासाठी बॉक्स करून रोलिंग पाणी टाकणे आवश्यक असताना हि कामचुकार पद्धत आहे का ? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. तर कंत्राटदार रस्त्याचे काम घाईघाईने पूर्ण करीत असल्याचेही दिसून येत आहे.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी भेट देवून कामाची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे.

रस्त्यासाठी मंजूर निधीचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का यावर लक्ष ठेवणे स्थानिकांचे काम आहे .मात्र स्थानिक कार्यकर्ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत नाहीत. त्यामुळे कंत्राटदार यांचे फावत असून तक्रार करणाऱ्याला चिरीमिरी देवून गप्प केले जात आहे.त्यामुळे कोट्यावधी निधी वापरून तयार होणारे काम कुचकामी ठरणार आहे.

याबाबत कंत्राटदार व्ही.एच खत्री यांच्या वर्क मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काम हे एस्टिमेट प्रमाणे सुरु असल्याचे सांगितले.तर एस्टिमेट पहावयास मिळेल का असे विचारले असता ते तुम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात मिळेल असे सांगितले. तर कामाच्या माहिती फलकाबद्दल विचारले असता आम्ही लावला होता मात्र पडून गेला असेल असे सांगितले. काम सुरु होवून आठ दिवसात फलक पडत असेल तर रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न निर्माण होतो.

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे डेप्युटी इंजिनिअर मनोहर सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगितले.तसेच याकामाची तपासणी केली जाणार असून सदर काम इस्टीमेंट प्रमाने होणार आहे व सध्या हे काम बंद ठेवण्याचे कंत्राटदाराला सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर रस्ता बारामतीतील नामांकित कंत्राटदार करत असून याच कंत्राटदाराने निरगुडे लाकडी निंबोडी भवानीनगर हा रस्ता तयार केला होता,या रस्त्याबाबत मोठा गाजावाजाही निर्माण झाला होता,आता कुंभारगाव पोंधवडी पिंपळे हा रस्ता सुद्धा त्याच पध्दतीने दर्जाहीन बनवला जात आहे.

Google Ad

5 thoughts on “कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात; कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह?

  1. Its such as you read my mind! You seem to understand a lot approximately this, like you wrote the ebook in it or something. I feel that you just could do with some to pressure the message house a bit, however instead of that, that is wonderful blog. A fantastic read. I’ll certainly be back.|

  2. You really make it seem so easy with your presentation but I find this matter to be really something which I think I would never understand. It seems too complex and extremely broad for me. I’m looking forward for your next post, I’ll try to get the hang of it!|

Leave a Reply

Your email address will not be published.