महामार्ग प्रशासनाकडून रस्त्यालगतचे व्यावसायिक हटविण्यात येत असल्याने कारवाईचा विरोध:महिलांचा ठिय्या

 

भिगवण प्रतिनिधी :

येथील पुणे-सोलापुर महामार्गा लगत भाजी विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर संबंधित प्रशासनाकडुन कारवाई करण्यास सुरुवात झाली असुन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी या कारवाईचा विरोध केला, तोंड बघुन करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे भाजी विक्री करणाऱ्या महिलांनी टोल प्रशासनाच्या क्रेन समोर बसुन विरोध दर्शविला.अनेक घडामोडीनंतर भाजीपाला विक्रेत्यांनी पुर्ववत आपल्या ठिकाणी व्यवसाय सुरूवात केली. महामार्गाच्या कडेला असणाऱ्या अनेक लहान मोठ्या व्यवसायामुळे नागरिकांची गर्दी होत असते यामुळे एखादा अपघात घडल्यानंतर फार मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. रत्यालगत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यावर कारवाई होत असता व्यवसायिकांनी विरोध करत कारवाईचे खंडन केले.

भाजीपाला विक्री किंवा इतर छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या महिलांनी या कारवाई विषयी बोलताना सांगितले की, कोरोनाच्या काळात आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून  आम्हाला शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. तरीही आम्ही जनजीवन सुरळीत होण्यासाठी,उपजिविकेसाठी व्यवसाय करून पोट भरत आहोत .आमच्या व्यवसायावर अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नसुन गावांमधील मोठमोठी अतिक्रमणे तशीच आहेत मग आम्हालाच का उठवले जात आहे ? असा सवाल भाजी विक्रेत्यांनी केला. ग्रामपंचायतीने आम्हाला कायमची पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची कळकळीची विनंती महिला भगिनी यांनी यावेळी केली.

Google Ad

10 thoughts on “महामार्ग प्रशासनाकडून रस्त्यालगतचे व्यावसायिक हटविण्यात येत असल्याने कारवाईचा विरोध:महिलांचा ठिय्या

Leave a Reply

Your email address will not be published.