विजेच्या लपंडावासह भिगवण व परिसरात मुसळधार पाऊस: शेतकऱ्यांचे नुकसान

भिगवण प्रतिनिधी:
आप्पासाहेब गायकवाड

दि.11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला होता. त्यानुसार महाराष्ट्रात कोकणसह ग्रामीण भागात पाऊस पूर्णपणे सक्रीय झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. गडगडाटासह जोरदार वारे वाहू लागलेले आहेत. या पावसाचा, कापणीला आलेल्या पिकांना धोका उत्पन्न होणार आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकर्‍यांना बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिकेही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची रात्रीची झोप उडाली आहे.

सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकर्‍यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आता मजुरांची कमतरता असल्याने शेतकर्‍यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट, बाजारातली मंदी, मजुरांची कमतरता यामुळे मार्ग कसा काढायचा असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे.

भिगवण व आसपासच्या अनेक भागात शनिवारी रात्रीच्या सुमारास आकाश अचानक भरून आले. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रविवार दि. ११ रोजीही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पण पुढचा आठवडाही असंच वातावरण राहणार आहे, त्यामुळे सावध राहा असं वेधशाळेने म्हटलं आहे. अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती दिली आहे.

Google Ad

8 thoughts on “विजेच्या लपंडावासह भिगवण व परिसरात मुसळधार पाऊस: शेतकऱ्यांचे नुकसान

  1. 567060 773830I discovered your weblog post web website on the search engines and appearance several of your early posts. Always preserve the top notch operate. I additional the Feed to my MSN News Reader. Seeking forward to reading a lot far more on your part down the line! 112910

  2. 971603 311429Its a shame you dont have a donate button! Id without a doubt donate to this brilliant weblog! I suppose for now ill settle for book-marking and adding your RSS feed to my Google account. I appear forward to fresh updates and will share this blog with my Facebook group. Chat soon! 252729

  3. 398245 469747I really like your write-up. It is evident which you have a good deal knowledge on this subject. Your points are nicely created and relatable. Thanks for writing engaging and intriguing material. 67277

  4. 97943 414351As far as me being a member here, I wasnt aware that I was a member for any days, truly. When the write-up was published I received a notification, so that I could participate inside the discussion of the post, That would explain me stumbuling upon this post. But were certainly all members inside the world of tips. 630188

Leave a Reply

Your email address will not be published.