राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 

भिगवण प्रतिनिधी :

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त भिगवण येथील परीट समाज मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.
संत गाडगे बाबा यांनी आपल्या किर्तनातुन समाज प्रबोधनाचे काम केले व समाजातील लोकांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे शिक्षण दिले ते ज्या गावात जात तेथील स्वच्छता करत असत अशा थोर समाज सुधारक, विचारवंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिगवण येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. गाडगे बाबा यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे परीट यांनी नमूद केले तसेच भिगवण परीट समाज संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परीट समाज बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

16 thoughts on “राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published.