ग्रामपंचायत निवडणुक लवकरच होण्याची शक्यता ? राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित निर्देश.

ग्रामपंचायत निवडणुक लवकरच होण्याची शक्यता ? राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित निर्देश.

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

राज्यात कोरोना माहामारीमुळे अचानक उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कामकाज (प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक) पुढील आदेश होईपर्यंत निवडणूक आयोगाकडून स्थगित (ता.१७ मार्च २०२०पासून ) करण्यात आले होते.

आता कोरोना रूग्ण संख्या बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे.अनेक ठिकाणी कोरोना सेंटर बंद झाले आहेत.योग्य उपचार पद्धतीमुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. योग्य ती खबरदारी घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्देश जारी करण्यात येत आहेत. हीच बाब विचारात घेता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी यांना ( ता.२०) प्रभाग रचनेच्या व आरक्षणाच्या अंतिम टप्प्यासाठी सुधारीत निर्देश दिले आहेत.

उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला दिनांक २७/१०/२०२० पर्यंत अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणेस सांगण्यात आले आहे. तर
जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला दिनांक ०२/११/२०२० पर्यंत (नमुना अ मध्ये) प्रसिध्द करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

या दिलेल्या आदेशामुळे आता ग्रामपंचायत/स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Google Ad

34 thoughts on “ग्रामपंचायत निवडणुक लवकरच होण्याची शक्यता ? राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित निर्देश.

Leave a Reply

Your email address will not be published.