कोरोना काळात ग्रामपंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर

 

भिगवन प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

कोरोणाच्या काळामध्ये ग्रामपंचायत भिगवण येथील प्रशासन सतर्क राहून ॲक्शन मोड वर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दिनांक ३ मे रोजी अचानक पणे येथील कोरोणा केअर सेंटर मधील स्वॅबसेंटर भरवस्तीत/ गावात मध्यभागी असलेल्या भैरवनाथ विद्यालय या ठिकाणी आणण्यात आले ,परिणामी त्या ठिकाणी स्वॅब देण्यासाठी नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती भर दुपारी खूपच ऊन असल्यामुळे टेस्ट साठी आलेल्या नागरिकांपैकी काही नागरिक सावलीसाठी मारुती मंदिराजवळ बसलेले होते तसेच काही नागरिक रस्त्यावर फिरत होते तर काही समाज मंदिरांमध्ये बसलेले होते. यामुळे येथे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पूर्वीच्या ठिकाणी सेंटर नेण्यासाठी भाग पाडले. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या जिवाला होणारा संभाव्य धोका टाळला गेला अन्यथा आजूबाजूला भटकणाऱ्या लोकांमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. स्वॅबसेंटर भैरवनाथ विद्यालय या ठिकाणी सुरू केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे भैरवनाथ विद्यालय येथे स्वॅबसेंटर सुरू करण्याबाबत मुख्याध्यापकांनाही कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती.

कोरोणाची बिकट परिस्थिती पाहता ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोरोणा सेंटर सुरू करण्यासाठीही गतकाळात आग्रह धरण्यात आला होता, त्याचबरोबर ऑक्सिजन बेड सुरू करण्यासाठीही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले गेले, भिगवण मध्ये सध्या सुरू असलेल्या कोरोना सेंटरला पाणी पुरवठा,तेथील साफसफाई,मंडप या सारख्या सोयीसुविधा देखील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पुरविल्या जात आहेत. त्याचबरोबर कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी भिगवण मध्ये वारंवार औषध फवारणी देखील केली जात आहे. मागील काही दिवसापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने “प्रशासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत
सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य यांनी गावांमध्ये फिरून व्यावसायिक, दुकानदार यांना मास्क लावणे, सॅनिटायझर चा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे यासारख्या सूचना देऊन जनजागृती देखील केली आहे .ग्रामपंचायत मधील काही सदस्यांनी कोरोना सेंटरसाठी वैयक्तिकरीत्या बेड,गादी देखील उपलब्ध करून दिले आहेत तसेच सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गरजूंना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सीजन बेड तसेच
रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाच्या वतीने गावामध्ये कोरोणा पेशंट चा सर्वे सुरू असून हा सर्वे देखील कशा पद्धतीने सुरू आहे यावर ग्रामपंचायत प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे काही दिवसापूर्वी भिगवण कोरोणा सेंटर येथे लसीकरणा करिता नोंदणी करण्यासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर नसल्याने काही सदस्यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी ऑपरेटरची नियुक्ती केली आहे.
एवढेच नव्हे तर कोरोणामुळे एखादा रुग्ण दगावल्यास त्याच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचारी पार पाडत आहेत.

यातून एकंदरीतच ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य अलर्ट असून ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या सतर्कतेमुळे व नियोजनामुळे भिगवण व परिसरातील रुग्ण संख्या मागील दोन दिवसात कमी झालेली आहे.

याकामी सरपंच तानाजी वायसे, सहा. पोलिस निरीक्षक जीवन माने, डॉ. गणेश पवार, डॉ.व्यवहारे, उपसरपंच प्रतिनिधी पिंटू शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे,अशोक शिंदे,अजित क्षीरसागर, संजय रायसोनी, जयदीप जाधव,दत्ता धवडे,तुषार क्षीरसागर,जावेद शेख,सत्यवान भोसले,गुराप्पा पवार,कपिल भाकरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रयत्न करीत आहेत.

Google Ad

3 thoughts on “कोरोना काळात ग्रामपंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर

  1. 79205 903589As I web site possessor I believe the content material matter here is rattling fantastic , appreciate it for your efforts. You must keep it up forever! Best of luck. 149075

Leave a Reply

Your email address will not be published.