विज कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ठ काम:भिगवण स्टेशन,डिकसळ येथील विज पुरवठा सुरळीत

 

 

 

 

भिगवण प्रतिनिधी:आप्पासाहेब गायकवाड

विजेची यंत्रणा ही एक अशी यंत्रणा आहे की ती चालु अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीचीच गरज लागते. मोबाईल, इंटरनेट चे तसे नाही, त्यांचे एकदा कनेक्शन घेतले कि त्याची सेवा संबंधीत कंपनीला एका ठिकाणी बसुन चालु अथवा बंद करता येते. वीज यंत्रणा त्याला अपवाद आहे. जर रात्री अपरात्री गेलेली वीज काही वेळात येत असेल तर, कोणीतरी भर पावसात, अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालुन विजेच्या खांबांवर चढलेला असतो ,तेव्हा कुठे वीज पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे वीज यंत्रणेवर निव्वळ दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजुन घेतली पाहिजे.

दोन दिवसापूर्वी झालेल्या अतीमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विजेची यंत्रणा विस्कळीत झाली. वादळी वाऱ्यामुळे भिगवण स्टेशन, डिकसळ, गावठाण फिडरचा जम्प नदीमधे तुटला गेला पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने गेली तीन दिवस झाले भिगवण स्टेशनला विज पुरवठा करणारी मुख्य वाहिनी चा डिओ गेल्यामुळे स्टेशनला व डिकसळ या ठिकाणी वीजपुरवठा कमी दाबाने होता.

या मुख्य वाहिनीचे दोन्ही खांब नदीपात्रात आहेत (ता.१६) पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने वीज कर्मचाऱ्यांना वाहत्या पाण्यामुळे तेथे जाण्यासाठी अडचण येत होती. यासाठी आबा नगरे यांनी आपली बोट ग्रामस्थ यांच्या मदतीने कोंढार चिंचोली येथुन टेम्पोमध्ये आणली. वीज वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठी जीवावर उदार होऊन वीज कर्मचारी गणेश हिंगसे, बापूराव बंडगर, दिपक खंडागळे, मनोज मडावी व स्टेशनचे वायरमन राहुल वागजकर, दिनेश शिंदे, इरफान शेख, दादा वाघ यांनी पाण्यात बोटमधून जाऊन काम पुर्ण केले.

धोका पत्कारून वेळेत केलेल्या कामामुळे विज कर्मचारी यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Google Ad

8 thoughts on “विज कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ठ काम:भिगवण स्टेशन,डिकसळ येथील विज पुरवठा सुरळीत

  1. 451617 787233If youre needing to produce alteration in an individuals llife, during i would say the Are generally Bodyweight peeling off pounds training course are a wide path within the direction of gaining any search. la weight loss 646429

  2. 515470 867722OK initial take a excellent appear at your self. What do you like what do you not like so considerably. Work on that which you do not like. But do not listen to other folks their opinions do not matter only yours does. Function on having the attitude that this is who you are and if they dont like it they can go to hell. 4636

Leave a Reply

Your email address will not be published.