आमदार सुनिल कांबळे यांची भिगवण येथे सदिच्छा भेट

 

भिगवण प्रतिनिधी

पुणे कँटोमेंट मतदार संघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे पुणे येथून अक्कलकोट दौऱ्यासाठी निघाले असता त्यांचे जुने स्नेही भिगवण चे मा.उपसरपंच संजय रायसोनी यांच्या मयुरेश ट्रेडर्स या ठिकाणी सदिच्छा भेटी साठी थांबले होते. यावेळी रायसोनी दांपत्याकडून त्यांना शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना अशोक शिंदे म्हणाले की, नुकतीच भिगवण ग्रामपंचायत ची निवडणूक झाली असून यामध्ये १७ पैकी १६ सदस्य निवडून आले असून भाजपचा पॅनेल विजयी झालेला आहे,तरी आपल्या आमदार फंडातून किंवा इतर निधीतून भिगवण साठी पाचशे मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.

तुषार क्षीरसागर यांनी बोलताना सांगितले की, सुनीलभाऊ कांबळे हे अत्यंत तळागाळातील, सर्वसामान्यांचे नेते असून विकास कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे आपल्या कर्तृत्वावर ते लोकप्रिय झालेले आहेत त्यामुळे ते निश्चितच आपल्याला मदत करतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

संजय रायसोनी यांनीही जुन्या मैत्रीच्या नात्यातून भिगवणसाठी विकासकामाकरिता हट्ट धरला.

आमदार सुनील कांबळे यांनी भिगवनकरांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त करताना सांगितले की,भिगवण गावच्या विकासासाठी निश्चितपणे आमदार फंडातून किंवा पक्षाच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देऊन गावाच्या विकासात मदत करू,असे आश्वासन त्यांनी दिले व पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

यावेळी भिगवणचे नूतन सरपंच तानाजी वायसे, अशोकराव शिंदे, पराग जाधव, तुषार क्षीरसागर, पिंटु शिंदे, हरिभाऊ पांढरे,जावेद शेख, जयदीप जाधव, दत्ता धवडे,अमित वाघ, कपिल भाकरे, विठ्ठल मस्के, अनिल देसाई, नरेंद शिंदे, सलमान शेख, सोहेल शेख, राकेश खटके व ग्रामस्थ उपस्थित होते

Google Ad

4 thoughts on “आमदार सुनिल कांबळे यांची भिगवण येथे सदिच्छा भेट

  1. Es ist möglich, Eintrag eine Menge Websites Versorgung der
    besten Artikel und deutliche Boni diese Schlitze bieten um ermöglichen es
    Ihnen, zu machen ein beträchtliche erwerben durch genießen diese Steckplätze.

Leave a Reply

Your email address will not be published.