समाजातून चांगले पत्रकार निर्माण व्हावेत : डॉ.प्रशांत चवरे

भिगवण प्रतिनिधी:

समाजात परिस्थितीची जाण असणारे,अभ्यासू,व जिज्ञासू पत्रकार निर्माण व्हावेत यासाठी मराठी पत्रकार संघ प्रयत्नशील असून, त्यासाठी त्यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण संघाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत चवरे यांनी केले.
येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण व विशेष सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी ते बोलत होते .

येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने दौंड, इंदापुर व बारामती तालुक्यातील १६ विदयालयांमध्ये पत्रकार दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना सन्मानपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन येथील तारादेवी लॉन्स येथे करण्यात आले होते. . १६ शाळांमधील लहान गट व मोठया गटातील एकूण ३२ विदयार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र वाटप करण्यातआले तर पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे, ग्राहक संरक्षणातील योगदानाबद्दल ऍड. तुषार झेंडे-पाटील, व्यसनमुक्तीतील कार्याबद्दल रमेश शितोळे-देशमुख यांना तर सामाजिक योगदानाबद्दल रोटरी क्लब ऑफ भिगवण, सायकल क्लब ऑफ भिगवण व नेचर फाऊंडेशन या संस्थाना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.पत्रकार संघाच्या उपक्रमाबद्दल उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले व यामुळे विद्यार्थ्यांना व समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविक पत्रकार डॉ. प्रशांत चवरे यांनी, सुत्रसंचालन नवनाथ सावंत व सागर जगदाळे यांनी केले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिगवण पोलिस स्टेशन चे सहा. पोलिस निरीक्षक दिलीप पवार होते. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डि.एन. जगताप, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, सरपंच तानाजी वायसे, माजी उपसरपंच शंकरराव गायकवाड,संपत बंडगर, संजय रायसोनी, सचिन बोगावत,विजय सोनवणे, सुरेश पिसाळ,तुषार क्षीरसागर,डॉ. जयप्रकाश खरड,अण्णासाहेब धवडे, केशव भापकर,संपत बंडगर, डॉ.अमोल खानावरे,संजय खाडे ,संजय चौधरी, रणजीत भोंगळे,देवानंद शेलार, दिनेश मारणे,जावेद शेख,जयदीप जाधव,कपिल भाकरे, गुराप्पा पवार, सत्यवान भोसले,अविनाश गायकवाड विद्यार्थी,पालक व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे संस्थापक सुरेश पिसाळ, उपाध्यक्ष विठ्ठल मोघे, विजय गायकवाड, सचिव तुषार क्षिरसागर, सहसचिव महेंद्र काळे, खजिनदार आकाश पवार, समन्वयक संतोष सोनवणे,नारायण मोरे,गणेश जराड, अप्पासाहेब मेंगावडे, डॉ. सुरेद्र शिरसट, अतुल काळदाते, प्रविण अंबोदरे, अरुण भोई,योगेश चव्हाण,गणेश चोपडे,अप्पासाहेब गायकवाड,,सागर घरत,सागर जगदाळे, इरफान तांबोळी, प्रा. तुषार वाबळे, विजय कुताळ, शैलेश परकाळे,सचिन राजेभोसले आदींनी परिश्रम घेतले.

Google Ad

11 thoughts on “समाजातून चांगले पत्रकार निर्माण व्हावेत : डॉ.प्रशांत चवरे

Leave a Reply

Your email address will not be published.