भिगवण मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भिगवण प्रतिनिधी:

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली.भिगवण व परिसरामध्ये रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत महामानवाला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

14 एप्रिल म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, तसेच हा एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. दरवर्षी भारतासह जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. या दिनाला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा करते.

या जयंती निमित्त येथील बौद्ध विहारामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले,तसेच मनोरंजनासाठी धुमाकूळ या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता व 14 एप्रिल रोजी ध्वजारोहन करून सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रमाच्या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यादरम्यान सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.