भिगवण रेल्वे स्टेशन येथे हैदराबाद- मुंबई एक्सप्रेस थांबविण्याची मागणी

 

भिगवण प्रतिनिधी

भिगवण येथील हैद्राबाद मुंबई रेल्वे एक्सप्रेस चा थांबा रद्द झाल्यामुळे प्रवाशामध्ये तीव्र नाराजी झाली होती ती पूर्ववत होण्यासाठी भिगवण रेल्वे स्टेशन येथे मा. महाप्रबंधक व उपप्रबंधक सुनील कुमार यांना निवेदन देण्यात आले.
इंदापुर तालुक्यातिल एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या भिगवण येथील हैदराबाद मुंबई एक्सप्रेस चा थांबा रद्द झाल्यामुळे पुणे मुंबई येथे ये जा करणाऱ्या प्रवाशामध्ये तसेच व्यापारी वर्गामधे तीव्र नाराजी आहे. भिगवण भागातून दररोज शासकीय, निम-सरकारी,कर्मचारी खाजगी नोकर,व्यावसायिक,उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच शासकीय कामांसाठी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा पुनर्वसन, जाती पडताळणी कार्यालय विविध जिल्ह्यातील कामांसाठी पुण्यात येने जाने करतात.
इंदापुर,करमाळा, दौंड पूर्व भाग तसेच कर्जत तालुक्यातील काही भाग येथील प्रवाशासाठी भिगवण रेल्वे स्टेशन हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. भिगवण या ठिकाणी वाढीव रेल्वे गाड्याची मागणी असताना जे चालु आहे ते रद्द झाल्यामुळे प्रवाशी व व्यापारी वर्गात नाराजी आहे. ती एक्सप्रेस पूर्ववत होण्यासाठी भिगवण रेल्वे स्टेशन येथे मा.महाप्रबंधक सी.एस.टी. उपप्रबंधक सुनील कुमार यांना दि 08 जून 2021रोजी निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी भिगवन चे सरपंच तानाजी वायसे, मा. उपसरपंच हरिश्चंद्र पांढरे,ग्राम पंचायत सदस्य कपिल भाकरे, मच्छिंद्र खड़के, जुबेर शेख,मा.उपसरपंच लाला रायसोनी,राकेश खटके आदि उपस्थित होते

Google Ad

59 thoughts on “भिगवण रेल्वे स्टेशन येथे हैदराबाद- मुंबई एक्सप्रेस थांबविण्याची मागणी

  1. Pretty section of content. I just stumbled upon your blog and in accession capital to assert that I acquire actually enjoyed account your blog posts. Any way I’ll be subscribing to your augment and even I achievement you access consistently fast.|

Leave a Reply

Your email address will not be published.