खानवटे येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी

 

दौंड प्रतिनिधी,
प्रा.सुनिल नगरे

जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.या वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र सण,उत्सव,समारंभ आदी रद्द करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात येत आहेत.
खानवटे गावात अखिल भारतीय मराठा महासंघ,खानवटे व रुद्रशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कोरोनासंबंधित सर्व नियम पाळून साधेपणाने साजरी करण्यात आली.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून गावासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ खानवटेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, रुद्रशंभू प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील आदी उपस्थित होते.

Google Ad

6 thoughts on “खानवटे येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी

  1. 206070 398436A persons Are usually Weight loss is certainly a practical and flexible an eating program method manufactured for people who suffer that want to weight loss and therefore ultimately conserve a much far more culture. weight loss 23474

Leave a Reply

Your email address will not be published.