अवैध गुटखा वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात भिगवण पोलिसांना मोठे यश: पाऊण कोटीचा मुद्देमाल जप्त

 

भिगवण प्रतिनिधी:
आप्पासाहेब गायकवाड

पुणे – सोलापूर महामार्गावरील भादलवाडी नजीक हॉटेल श्रीनिवास समोर पोलिस नाईक इकबाल पठाण हे पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या समोरून एक कंटेनर के. ए. २२ डी २२७४ सोलापूर कडून पुण्याच्या दिशेला जात असताना, कंटनेरमध्ये काही अवैध माल असल्याचा संशय आल्याने त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तो कंटेनर
थांबविला .त्यावेळी संबधीत चालक व इतर दोघे यांना विचारपुस केली असता त्यांनी उडवा – उडवीची उत्तरे दिली. कंटेनर सील बंद असल्याने घटनास्थळी भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने व त्यांचे सहकारी दाखल झाले. त्यावेळी कंटेनरचे सील तोडले,त्यामध्ये पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या गोण्यामध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी १) कंटेनर चालक करम हुसेन पिता हसन राजा चौधरी वय-३३ रा.मुडीला ता. मोहदावल जि.संतकबीरनगर (उत्तर प्रदेश) २) शहजादा तुफेल खान ३) शाबाद तुफेल खान, दोघे रा. कोढवा पोलीस स्टेशन मागे पुणे ४) माल पुरवणारा अनोळखी पुरवठादार (नाव व पत्ता माहित नाही) ५) गुटखा उत्पादक एच. आय. तांबोळी अॅड सन्स रा.यरनाळ ता. चिकोडी जि. बेळगाव (कर्नाटक) यांचे विरूध्द भादंवि, अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ व नियमन २०११, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई भिगवण सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख करत आहे.

सदर कारवाईत ७६ लाख २४ हजार ७६० रूपयाचा मुद्देमाल जप्त केल्यामुळे भिगवण पोलिस ठाण्याची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

Google Ad

4 thoughts on “अवैध गुटखा वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात भिगवण पोलिसांना मोठे यश: पाऊण कोटीचा मुद्देमाल जप्त

  1. 350786 891287Genuinely fighter messages are supposed to amuse offer praise into the groom and bride. First time audio system watching more than the top places really should also remember you see, the senior guideline with the speaking, which is your particular person. best man speeches brother 62653

Leave a Reply

Your email address will not be published.