भिगवण रोटरीच्या शिरपेचात मानाचा तुरा : स्टार ट्रान्सफॉर्मर अवार्ड ने सन्मानित

 

भिगवण प्रतिनिधी :

भिगवण रोटरी क्लबने नेहमीच गरजू लोकांना निःपक्षपाती पणे मदतीचा हात दिलेला आहे.त्यांनी सातत्यपूर्ण केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल स्टार ट्रान्सफॉर्मर अवार्ड व डिस्ट्रिक्ट 3131 च्या पंचम प्रोजेक्ट मध्ये सहभागी झाल्या बद्दल दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी पुणे येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रश्मी कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गेले वर्षभर संपूर्ण देशात, जगात व आपल्या परिसरात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले होते त्यावेळी भिगवण रोटरी क्लबने लॉकडाऊन काळात गोरगरिबांना अन्न धान्य, मास्क सॅनिटाईजर वाटप तसेच गोरगरिबांना दिवाळी फराळ व ब्लॅंकेट वाटप,शाळांसाठी संगणक वाटप,इ लर्निंग संच देणे,आर.ओ. वॉटर फिल्टर बसिवणे,मुला मुलीसाठी स्वच्छता गृह बांधणे अशी विविध प्रकारची कामे केलेली आहेत.
तसेच कोरोना काळात कोविड केअर सेंटर ला मास्क सॅनिटायझर, बीपी मशीन, ऑक्सिजन मशीन, आयुर्वेदिक काढा तसेच हॉस्पिटल मधील रुग्णांना पोषक आहार देणे तेथे काम करणाऱ्या डॉक्टर व नर्सेस यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करने असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी भिगवण रोटरी क्लबचे सन 2020/21 चे अध्यक्ष संपत बंडगर सचिव दिपाली भोंगळे विद्यमान अध्यक्ष संजय खाडे ,रेखा खाडे व इतर सदस्यांनी पुणे येथे हा बहुमान स्वीकारला.त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येते आहे.

Google Ad

9 thoughts on “भिगवण रोटरीच्या शिरपेचात मानाचा तुरा : स्टार ट्रान्सफॉर्मर अवार्ड ने सन्मानित

Leave a Reply

Your email address will not be published.