भिगवण कोविड सेंटरला दोन दिवसात पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

भिगवण कोविड सेंटरला दोन दिवसात पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतही कडक सूचना

भिगवण प्रतिनिधी :
आप्पासाहेब गायकवाड

इंदापुर तालुक्यात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या व त्यासाठी कमी पडणारी बेडची व इतर सुविधा विचारात घेता भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये पन्नास ऑक्सिजन बेडची व्यवस्था व वैदयकिय आधिकाऱ्याची उपलब्धता दोन दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापुर तालुक्यामध्ये विशेषतः इंदापूर शहर,वालचंदनगर, भिगवन, निमगाव केतकी,बावडा या भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

यावेळी प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, प्रभारी तहसलिदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन बोगावत, सरपंच तानाजी वायसे, भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, तुषार क्षीरसागर, दत्ता धवडे, जावेद शेख, धनंजय थोरात, सुरेश बिबे,व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,इंदापुर तालुक्यामध्ये आजपर्यंत ८१८६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील १७४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर, सध्या १३६१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तालुक्यातील रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा व्हावा तसेच आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन करावे.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे व माजी सरपंच पराग जाधव यांनी कोरोना रुग्णांना जाणवत असलेली बेडची, रेमडेसीव्हीर औषधे व ऑक्सिजन बेडची अडचण मांडली व भिगवण येथे ऑक्सीजन बेडची तातडीने सुविधा दयावी अशी मागणी केली. बैठकीसाठी आरोग्य विभाग, महसुल विभाग, पोलिस प्रशासन आदी विभागातील आधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना राज्यमंत्री भरणे यांनी दिल्या.

Google Ad

63 thoughts on “भिगवण कोविड सेंटरला दोन दिवसात पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

  1. 457956 40684yourselfm as burning with excitement along accumulative concentrating. alter ego was rather apocalyptic by the mated ethical self went up to. It is punk up to closed ego dispirited. All respecting those topics are movables her need to discover no end touching unpronounced. Thanks so significantly! 354097

Leave a Reply

Your email address will not be published.