सावधान ! भिगवन व परिसरामध्ये कोरोणाचा धोका वाढतोय… प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा

भिगवण प्रतिनिधी: दि.९/९/२०२०
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण व परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे शासनाने वेळोवेळी विहित केलेले नियम यामध्ये मास्क वापरणे,सोशल डिस्टंसिंग पाळणे ,सॅनिटायझर चा वापर करणे त्याचबरोबर गर्दी न करणे असे विविध नियम शासनाने निर्देशित केलेले असताना देखील भिगवण व परिसरामध्ये काही व्यावसायिक,दुकानदार यांच्याकडून मात्र नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

याच पार्श्वभूमीवर भिगवण ग्रामपंचायत यांच्यावतीने दि.९ सप्टेंबर २०२० रोजी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना समितीची सभा घेण्यात आली. त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार येथील व्यावसाय ,बाजारपेठ ,दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ६ वा.पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर दर शनिवारी जनता कर्फ्यू राहणार असून या दिवशी सर्व दुकाने व बाजारपेठ (स्वयंस्फूर्तीने)बंद राहतील, शासनाने निर्धारित केलेले कोरोणा प्रतिबंधात्मक नियम न पाळल्यास सदर व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.तसेच व्यावसायिक दुकानदार यांनीदेखील आपल्या दुकानांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे अनिवार्य असणार आहे. दुकानांमध्ये सॅनिटायझर चा वापर करणे ,रजिस्टरमध्ये दुकानात आलेल्या प्रत्येक व्यक्तींची नोंद ठेवणे अनिवार्य असून हे नियम सर्वांवर बंधनकारक असणार आहेत .

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासन प्रमुख जीवन माने यांनी सांगितले आहे,

तर भिगवन मधील नागरिकांनी व भिगवण मध्ये येणाऱ्या इतर गावातील व्यक्तींनी कोरोणा प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शिस्तीचे व नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे सरपंच अनिता संतोष धवडे यांनी सांगितले.

नागरिकांनीदेखील हलगर्जीपणा न करता सर्व नियम काटेकोरपणे पाळले तरच आपण कोरोणा सारख्या महामारी विरोधात लढू शकू अन्यथा दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या व धोका वाढत राहील असे मत पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी व्यक्त केले.

सदर सभेसाठी सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य तसेच गाव कामगार तलाठी धनंजय गाडेकर , प्रभारी अधिकारी दत्तात्रय परदेसी,पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख उपस्थित होते.

Google Ad

4 thoughts on “सावधान ! भिगवन व परिसरामध्ये कोरोणाचा धोका वाढतोय… प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा

  1. 946761 565988Superb read, I just passed this onto a friend who was performing some research on that. And he in fact bought me lunch since I identified it for him smile So let me rephrase that: Thank you for lunch! 371519

  2. 954434 274002Hey i just visited your internet site for the first time and i really liked it, i bookmarked it and will likely be back 87414

Leave a Reply

Your email address will not be published.