भिगवन पोलिस ठाणे चे ए.एस.आय.महम्मदअली शेख सेवानिवृत्त: यथोचित सन्मान

 

भिगवण प्रतिनिधी
आप्पासाहेब गायकवाड

भिगवण पोलीस स्टेशन येथे शासकिय वाहनावर चालक म्हणुन सेवेत कार्यरत असणारे ए.एस.आय.मोहम्मद अली यासीन शेख हे दिनांक ३०/०९/२०२० रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने व सहकारी यांनी कार्यक्रम आयोजित करून त्यांना निरोप दिला.

महम्मदअली यासीन शेख हे सन १९८२ साली पोलीस शिपाई म्हणुन खात्यात भरती झाले होते. त्यांनी एसआरपी गट ०६ धुळे येथे १९८२ ते १९८६ सेवा केली. त्यानंतर १९८६ ते २०१२ पर्यंत एसआरपीएफ गट नं. ०७ दौंड येथे सेवा बजाविली. तद्नंतर सन २०१२ ते २०१५ मुख्यालय येथे सेवा बजाविली होती. शेवटी ते जुन २०१५ पासुन भिगवण पोलीस स्टेशन येथे चालक म्हणुन कर्तव्यावर होते. त्यांनी तब्बल ३८ वर्ष ०९ महीने अशी प्रदीर्घ सेवा केली आहे.

मोहम्मद अली यासीन शेख हे अतिशय मितभाषी, नम्र आणि कर्तव्यदक्ष म्हणुन सर्वपरिचीत होते. चालक म्हणुन कर्तव्य बजावत असताना आजपर्यंत त्यांच्याकडून कसल्याच प्रकारचा अपघात घडला नाही. आजचे नविन पोलीस कर्मचारी यांनी शेख यांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे गौरवोदगार माने यांनी बोलताना काढले,महम्मदअली यासीन शेख यांचा पोलीस स्टेशन तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस कर्मचारी, अधिकारी, शेख यांचे कुटंबीय उपस्थित होते. त्यांच्या बरोबर काम करणारे पोलिस सहकारी यांनी व नागरिकांनीही मनोगत व्यक्त केले.

शासकिय वाहनातुन बसवुन त्यांना निरोप देण्यात आला यावेळी अधिकारी यांचे जागी शेख यांना बसवून पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी स्वतः वाहन चालवुन त्यांच्यावर फुले टाकुन सन्मान केला. व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Google Ad

7 thoughts on “भिगवन पोलिस ठाणे चे ए.एस.आय.महम्मदअली शेख सेवानिवृत्त: यथोचित सन्मान

  1. 767832 17159I actually delighted to locate this internet site on bing, just what I was searching for : D too saved to fav. 226852

  2. 726499 831526I came across this good from you out of sheer luck and never believe lucky enough to say also credit you for any job well done. 234845

Leave a Reply

Your email address will not be published.