विटगण कंपनीच्या वतीने ५० बेडची व्यवस्था

 

दौंड प्रतिनिधी,
प्रा.सुनिल नगरे

दौंड तालुक्यात एकीकडे कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असतानाच दुसरीकडे आहेत ती कोविड केयर सेंटर कमी पडू लागली आहेत.म्हणून ठिकठिकाणी कोविड केयर सेंटर सुरू करण्यात आहेत.
भांडगाव हद्दीत असलेल्या विटगण कंपनीच्या वतीने बोरीभडक येथील नुकत्याच सुरू झालेल्या शारदा आरोग्य मंदिर या कोविड केयर सेंटरला 40 व शिवमंगल हॉस्पिटलला 10 असे एकूण 50 बेड भेट देण्यात आले.यापूर्वीही या कंपनीच्या वतीने सामाजिक जाणिवेतून शाळेस वर्गखोल्या बांधून देणे,विधवांना पीठ गिरण्यांचे वाटप करणे तसेच विविध कुटुंबांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना किटचे वाटप करणे यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या काळात विटगण कंपनीने 50 बेड उपलब्ध करून दिल्याने दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दोरगे व आदींनी कंपनी प्रशासनाचे आभार मानले.

Google Ad

7 thoughts on “विटगण कंपनीच्या वतीने ५० बेडची व्यवस्था

Leave a Reply

Your email address will not be published.