यशस्विनी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी पुष्पा थोरात यांची नियुक्ती

भिगवण प्रतिनिधी:

भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटात यशस्विनी महिला प्रभागसंघ संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी भिगवण प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी मदनवाडी येथील पुष्पा विकास थोरात यांची निवड करण्यात आली.
इंदापूर विकास गटाअंतर्गत भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील १२ ग्रामपंचायतमधील १२ ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांची मिळून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रणित ” यशस्विनी महिला प्रभागसंघ संस्था भिगवणमध्ये नुकतीच स्थापन करण्यात आली.आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून महिला समूहातील ,ग्रामसंघातील व प्रभागातील महिलांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यावेळी उमेद अभियानाविषयी तालुका अभियान व्यस्थापक सचिन बाबर,तालुका व्यवस्थापिका राणी ननवरे यांनी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी सणसर – लासुर्णे गटाचे प्रभाग समन्वयक डी.जे.राऊत,भिगवण-शेटफळगढेचे प्रभाग समन्वयक चेतन रांजणकर,प्रभागसंघाच्या अध्यक्ष पुष्पा थोरात,सचिव राणी खरात ,कोषाध्यक्ष सुनीता नरुटे यांच्यासह सदस्य व समूह संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या.

Google Ad

9 thoughts on “यशस्विनी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी पुष्पा थोरात यांची नियुक्ती

  1. Hi there! Someone in my Myspace group shared this site with us so I came to look it over. I’m definitely loving the information. I’m bookmarking and will be tweeting this to my followers! Terrific blog and brilliant design.|

Leave a Reply

Your email address will not be published.