शिवसेनेच्या वतीने पाटस येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

दौंड प्रतिनिधी:प्रा.सुनिल नगरे

पाटस (ता.दौंड) येथे शिवसेना मदत कक्षाच्या वतीने, शिवसेना मदत कक्षचे संस्थापक,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व “मल्हारदिप् हॉटेल” चे उदघाट्न करण्यात आले.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागात मागील बऱ्याच काळापासून रुग्णांचे रुग्णवाहिकेअभावी हाल होत आहेत.गंभीर आजार असणाऱ्यांसाठी तसेंच काही वेळा तातडीने उपचारासाठी रुग्णालयात जाणाऱ्यांसाठी वाहन उपलब्ध होत नाही,अशा वेळी या भागात रुग्णवहिका उपलब्ध व्हावी व रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व तालुका समन्वयक डॉ.प्रमोद रंधवे यांच्या पुढाकाराने ही रुग्णवाहिका सुरु करण्यात आली.
तालुक्यातील लोकांची वैद्यकीय बाबतीत होणारी गैरसोय पाहून वारंवार पाठपुरावा करून ही रुग्णवाहीका सुरु केली असल्याची माहिती यावेळी डॉ.प्रमोद रंधवे यांनी दिली.यापूर्वीही आम्ही लोकहिताची कामे केली आहेत आणि यापुढेही करत राहू,असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्क समन्वयक राजेंद्र भिलारे,दौंड विधानसभा संपर्क समन्यवयक आदिराज कोठाडिया,दौंड मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.बरंगाळे व कार्यकारी सदस्य डॉ.रोहन खवटे, दौंड तालुका सहाय्य्क समन्व्यक शैलेश पिल्ले,लक्ष्मण सरोदे,रमेश मोघे,आप्पा गाडे,रोटी गावचे सरपंच तसेंच ग्रामस्थ, महिला आदी उपस्थित होते.

Google Ad

21 thoughts on “शिवसेनेच्या वतीने पाटस येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

  1. Your style is unique in comparison to other people I’ve read stuff from. Thanks for posting when you have the opportunity, Guess I will just bookmark this page.|

  2. No matter if some one searches for his essential thing, so he/she wants to be available that in detail, thus that thing is maintained over here.|

Leave a Reply

Your email address will not be published.