“प्रशासन आपल्या दारी”,कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायत भिगवण आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त मोहीम

 

भिगवन प्रतिनिधी:
आप्पासाहेब गायकवाड

कोरोणाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला असून रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, इंजेक्शन मिळणे फारच दुरापास्त झाले आहे. काही रुग्ण यामुळे दगावले आहेत.भिगवन व परिसरात देखील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्यासाठी ग्रामपंचायत भिगवन व पोलीस स्टेशन यांच्या वतीने “प्रशासन आपल्या दारी” ही संयुक्त मोहीम दिनांक 16 रोजी राबवण्यात आली.

यामध्ये भिगवन पोलिस स्टेशन चे सहा.पोलिस निरीक्षक जीवन माने तसेच त्यांचे सहकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक,सहभागी झाले होते.

सध्या फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत त्यामुळे या सेवेतील दुकानदार, व्यावसायिक यांना कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियम पाळण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या, यामध्ये मास्क लावणे, सेनिटायझर चा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर दर १५ दिवसांनी प्रत्येक दुकानदाराने स्वतःची व दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोणा चाचणी करून घेण्याचे तसेच स्वतःची व परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच वारंवार सूचना देऊनही नियम मोडणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

यावेळी सहा.पोलिस निरीक्षक जीवन माने, सरपंच तानाजी वायसे, प.स.इंदापूर चे उपसभापती संजय देहाडे,माजी सरपंच पराग जाधव,संजय रायसोनी,तुषार क्षीरसागर, जावेद शेख,दत्ता धवडे, सत्यवान भोसले,ग्रामसेवक परदेशी उपस्थित होते.

Google Ad

8 thoughts on ““प्रशासन आपल्या दारी”,कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायत भिगवण आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त मोहीम

  1. 184693 355033A really informationrmative post and lots of genuinely honest and forthright comments created! This certainly got me thinking a great deal about this problem so cheers a good deal for dropping! 364123

  2. 29789 884210Hi there. Very cool web site!! Guy .. Beautiful .. Amazing .. I will bookmark your site and take the feeds additionallyI am glad to locate so considerably beneficial info appropriate here inside the write-up. Thanks for sharing 268760

Leave a Reply

Your email address will not be published.