कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर प्राचार्यांनी प्राध्यापकांच्या जीवाशी खेळू नये?

पुणे | शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने घालून दिलेल्या लाॅकडाऊन नियमांचे पालन न करता अनेक महाविद्यालयामध्ये प्राचार्य नोटीसद्वारे प्राध्यापक कर्मचारी यांना एकाच वेळी एकत्र महाविद्यालयात पाच तास उपस्थित राहण्याचे बंधनकारक आहे. अशी नोटीस काढून कोरोनाच्या संकट काळात प्राध्यापक कर्मचारी यांच्या जिवाशी खेळत आहेत. प्राचार्य संस्थाध्यक्ष आदेशानुसार असा उल्लेख करून नोटीस काढत असून नोटीस फाईलला न लावता प्रत्येक प्राध्यापकांना सही करायला सांगून संबंधित कर्मचारी नोटीस पूर्ण वाचायला न देता हातातून काढून घेतली जाते.

फेसमास्क काढून बायोमेट्रिक करावे लागते, गर्दी मुळे सोशल डिस्टनसिंग राहात नाही. तसेच जागतिक संसर्गजन्य आजार आरोग्य आपत्ती व्यवस्थापन कायदा नुसार परिपत्रक अंतर्गत सर्व प्राध्यापकांना एका वेळी महाविद्यालय परिसरात विनाकारण बोलावू नये प्राध्यापकांचा 15% अॅटेन्डस आणि आॅनलाईन मिटींग घ्यायला हवी परंतु बहुतांशी महाविद्यालयात प्राचार्य एकटे मिटींग घ्यायला सक्षम नाहीत म्हणून संस्थाध्यक्ष मिटींगला उपस्थित राहणार आहेत असं प्रत्येक वेळी प्राध्यापकांना नोटीस काढून दबाव आणतात, अशी् तक्रार अनेक प्राध्यापक आणि कर्मचारी करत आहेत. काम करण्याची सर्वाची तयारी आहे परंतु अशा पद्धतीने प्रशासन चालवू नये की कोरोना संसर्गाच्या आजाराचा जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

Google Ad

154 thoughts on “कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर प्राचार्यांनी प्राध्यापकांच्या जीवाशी खेळू नये?

  1. Pingback: sex vr games

Leave a Reply

Your email address will not be published.